आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे योगविरांची “सुवर्णझेप”.जिल्ह्यात विजयी घौडदौड करत 8 सुवर्ण,6 रौप्य,2 कांस्य पदकांची लूट!

जिल्हा गाजवत राज्य स्तरावर झेपावले आयडियल इंग्लिश स्कूल चे आठ योगवीर.

कणकवली/मयूर ठाकूर जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट्स असोसिएशनची योगा स्पर्धा दिनांक 26 व 27 जुलै 2025 रोजी ओरस येथे भव्य स्वरूपात पार पडली.या स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट योगकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.स्पर्धेत शाळेच्या 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,त्यापैकी 19 विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत एकूण 16 पदकांवर मोहोर उमटवली.यात 8 सुवर्ण,6 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे.तसेच उत्तेजनार्थ म्हणून दोन विद्यार्थ्यांला बक्षीस प्राप्त झाले आहे.
या शानदार कामगिरीमुळे आठ सुवर्णपदक विजेत्यांची निवड आता अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली असून ही निवड म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही गौरवाची बाब आहे. विजयी झालेल्या स्पर्धाकांमध्ये कु.भावेश धोंडी घाडीगावकर सुवर्णपदक व रौप्य पदक,कु.शिफा बुलंद पटेल सुवर्णपदक व रौप्य पदक,कु.गिरिजा मंगेश मोहिते 2 सुवर्णपदक,कु.आयुष अवधूत बागवे 2 सुवर्णपदक,कु.हितेश महेश डिचोलकर 2 सुवर्णपदक,कु.दिव्या उदय काटे 1 कांस्य पदक,कु.गार्गी चंद्रकांत पुरळकर 1 रौप्य पदक व कांस्यपदक ,लोकेश कृष्णा कुडाळकर रौप्यपदक तसेच राही अजित ठाकूर व कश्यप वातकर यां विध्यार्थ्यांचा सहभाग आहे.आयडियल इंग्लिश स्कूलने गेल्या काही वर्षांपासून योगक्षेत्रात सातत्याने चमकदार कामगिरी करत विद्यार्थ्यांमध्ये योगप्रेम आणि स्पर्धात्मकता यांचे संगोपन केले आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!