कणकवलीत उड्डाणपुलाखाली पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई

आरटीओ, कणकवली पोलिसांची संयुक्त कारवाई
कारवाई तात्पुरती ठरू नये अशी होते मागणी
कणकवली शहरात एस. एम. हायस्कूल ते श्रीधर नाईक चौकापर्यंत उड्डाणपुल आहे. या उड्डाणपुलाखाली प्रामुख्याने अवजड वाहनांचे पार्किंग केले जाते. तसेच तेथील हॉटेल, लॉज, शासकीय, खासगी कार्यालयांनी देखील त्यांच्याकडे येणारे ग्राहक, कर्मचारी यांची वाहने पार्किंगसाठी उड्डाणपुलाखालील जागेचा वापर सुरू केला आहे. पूर्वी उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त होती. मात्र तेथील बॅरिकेट काढून तेथे वाहन पार्किंग केले जात आहे. ही वाहने थेट महामार्गावर येत असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहने हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिस बंदोबस्त घटनास्थळी कार्यरत आहेत. मात्र ही सुरू असलेले कारवाई ही तात्पुरती ठरु नये अशी मागणी केली जात आहे.