संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन

अतिग्रे – येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सलग 12 व्या वर्षी सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दिनांक 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर पार पडतील. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील 172 सीबीएसई स्कूलमधील 1200 हून अधिक खेळाडू सहभागी होतील.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती म्हणाल्या, ” सीबीएसईने सलग बारा वर्षे या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे यजमान पद आमच्याकडे देऊन आमच्यावर एक विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासास आम्ही नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करतो. खेळाडूंसाठी राहण्याची, जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व स्पर्धा निपक्ष पद्धतीने पार पडतील. सीबीएसई नियुक्त परीक्षक या स्पर्धेसाठी चार दिवस उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर पोलीस श्री प्रणील गिल्डा, संजय घोडावत समूहाचे अध्यक्ष श्री संजय घोडावत, कोल्हापूर जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी प्रकुल पाटील मांगुरे हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.00 वा वाजता होईल. तीन दिवस या स्पर्धा शाळेच्या मैदानावर चालणार आहेत. खेळाडूंना आम्ही उत्कृष्ट सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांचेही मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला मिळत आहे. स्पर्धेसाठी परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.” या पत्रकार परिषदेसाठी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्री अस्कर अली उपस्थित होते.