रानभाज्यांचे वैभव शोभेचे दर्शन – आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे आगळेवेगळे प्रदर्शन.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज वरवडे येथे नुकतेच एक आगळे वेगळे आणि ज्ञानसमृद्ध असं रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन उत्साहात संपन्न झालं. इयत्ता 1 ली ते 3 री पर्यंतच्या विध्यार्थ्यांच्या हस्ते साकारलेले जैविक वैभव म्हणजे ग्रामीण जीवन शैलीचे जिवंत प्रतिबिंब ठरले.
या प्रदर्शनात तांदली, कुर्डू, भारंगी, माठ, कार्टूली, शेवगा, चिंचीड, अळू, टाकळा, निरगुडी अशा अनेक दुर्मिळ रान भाज्यांचे आकर्षक नमुने मांडण्यात आले होते.
सुरुवातीला ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर, सल्लागार डी. पी. तानावडे सर, शिक्षक पालक संघांचे स्वप्नील कदम सर, रेवा धुमाळे मॅडम तसेच आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विध्यार्थ्यानी केवळ रान भाज्यांची ओळख करून दिली नाही तर त्यांच्या औषधी गुणधर्माबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयडियल इंग्लिश स्कूल चे शिक्षक सौ.परिमला गोडवे, दिया मुंज सौ. निधी गुरव, सौ.प्राची चव्हाण, फातिमा कुडाळकर, मधुरा कदम, श्रेया कसवणकर यांनी विशेष परिश्रम केले.
सदर कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर सर,खजिनदार सौ.शितल सावंत मॅडम सल्लागार श्री.डी.पी तानावडे सर,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!