लाजरी क्रिकेट ग्रुपच्या मॉन्सून महोत्सवाला सुरुवात

रसिकांचा उदंड प्रतिसाद
‘महायोद्धा इरावन’ हे संयुक्त दशावतारी नाटक सादर
कुडाळ : दशावतारी नाट्य रसिकाना उत्कंठा लागून राहिलेल्या कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या ‘मान्सून महोत्सव- 2025’ ला येथील सिद्धिविनायक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. नाट्य रसिकांच्या उदंड प्रतिसादात शुभारंभ झालेल्या या मान्सून महोत्सवाचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत दशावतारी नाट्य कलाकारांनी एकत्र येत ‘महायोद्धा इरावन’ हे संयुक्त दशावतारी नाटक सादर केले.
लाजरी क्रिकेट गृपच्या माध्यमातून गेली १२ वर्षे हा दशावतारी नाट्य महोत्सव होत आहे. याची मूळ संकल्पना लाजरी क्रिकेट गृपचे राजेश महाडेश्वर यांची. या मॉन्सून महोत्सवचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर, सुनील धुरी, नाट्यप्रेमी गजानन गावस व प्रसाद परब, पोलीस अधिकारी संजय मांजरेकर, खानोलाकर दशावतार मंडळाचे मालक बाबा मेस्त्री, कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलिंगण, कवठी ग्रामस्थ मंडळ ( मुबंई ) चे संजय करलकर, ज्येष्ठ भजनीबुवा प्रकाश पारकर, अमोल राणे, कुडाळ तालुका दशावतारी संघटना अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर, भूमिका दशावतार मंडळाचे मालक नितीन आसयेकर, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, केरवडे उपसरपंच अर्जुन परब, बांदा सरपंच बाळा आकेरकर, अनंत भोगटे, दत्ताराम काळसेकर, लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर, पत्रकार प्रमोद ठाकूर, निलेश जोशी, अजय सावंत, प्रसाद राणे, काशीराम गायकवाड आदी मान्यवराचा सत्कार करण्यात आला. यावेळी लाजरी क्रिकेट गृपचे दीपक भोगटे, स्वरूप सांवत, बादल चोधरी, सदा अणावकर, सिद्धेश बांदेकर, नागेश नार्वेकर,अभि पावसकर,अनुप शिरसट, प्रीतम कवठकर व अन्य सदस्य उपस्थित होते. बुवा प्रकाश पारकर आणि रुपेश पावसकर यांनी लाजरी क्रिकेट गृपच्या उपक्रमाबद्दल कौतुक करून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. निवेदन राजा सामंत यांनी केले.उदघाटन सोहळ्यानंतर ‘महायोद्धा इरावन’ हे संयुक्त दशावतारी नाटक सादर करण्यात आले. उद्या १ ऑगस्टला या महोत्सवाची सांगता होणार उद्या ‘थाळी हरण’ हे संयुक्त दशावतारी नाटक सादर होणार आहे.