जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून भजनी मंडळांना मिळणार अनुदान.

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे संस्थाध्यक्ष बुवा.संतोष कानडे यांची पत्रकार परिषदेत माहिती.
कणकवली/मयूर ठाकूर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन मंडळांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांसकाडून भजनी वाद्ये दिली जातात.यामध्ये पखवाज,टाळ,चकी आणि अन्य वाद्यांचा समावेश असतो.भजनी मंडळांना ही वाद्या न देता वाद्य दुरुस्ती व खरेदीसाठी अनुदान दयावे अशी आग्रही मागणी भजनी कलाकार संस्थेचे संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याकडे केली होती. ही संकल्पना पालकमंत्री महोदयांना योग्य वाटली आणि पालकमंत्री नितेशजी राणे यांनी आपली ही मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. यासंदर्भात पाठपुरावा संतोष कानडे बुवा यांनी केल्यानंतर या मागणीला आता यश आले आहे.
पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून लाभार्थी भजन मंडळांना भजनाची वाद्ये खरेदी करण्यासाठी आता गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनुदान प्राप्त होणार आहे.जिल्ह्यामध्ये अश्या प्रकारचे भजन मंडळांना अनुदान पहिल्यांदाच शासनामार्फत मिळत असून जिल्ह्यातील भजन सांप्रदायातील सर्व मंडळीकडून या निर्णयाचे कौतुक होत आहे.पालकमंत्री यांच्याकडे केलेली मागणी त्यांनी तातडीने पूर्ण केल्याबद्दल भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे बुवा यांनी पालकांमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले.
सदरील माहिती पत्रकार परिषदेत बोलताना भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी दिली असून प्रसंगी संस्थेचे सचिव गोपी लाड.उपाध्यक्ष प्रकाश पारकर,सह खजिनदार मयूर ठाकूर,संचालक नामदेव गिरकर उपस्थित होते.