शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पंचक्रोशीतील जि.प शाळेत वह्या वाटप

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे प्रतिपादन
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज नांदगाव शिवसेना-युवासेनेच्या वतीने नांदगाव पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. यामध्ये जि. प .पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवली नंबर 1, जि प.प्राथमीक शाळा तोंडवली बोभाटेवाडी, जि प प्राथमीक शाळा तोंडवली गावठण, जि. प. प्राथ. शाळा बावशी नंबर एक 5, जि.प प्राथ.शाळा बावशी शेळीची या शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, विभागप्रमुख तात्या निकम, युवासेना उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, तेजस बोभाटे, संजय नाडकर्णी, सुनील पवार, भाऊ रामबाडे,चंद्रकांत बोभाटे, गंगाधर बोभाटे,सुप्रिया खडपे, स्वप्नील खडपे, प्रवीण मोरये आदी शिवसैनिक, ग्रामस्थ, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.