रोटरी क्लब कणकवली सेंट्रल व संविता आश्रम पणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन.

शासन संचलित सार्वजनिक रुग्णालये व दवाखाने हे सर्वसामान्य जनतेची सेवा केंद्रे असल्याने ती स्वच्छ व सुंदर असावीत, या भूमिकेतून ही मोहीम आयोजित करण्याचा मानस कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॅा.विद्याधर तायशेटे यांनी रोटरी क्लब च्या मीटिंग मध्ये मांडला.
रोटरी क्लब कणकवली चे अध्यक्ष रोटे.अॅड.राजेंद्र रावराणे , सेक्रेटरी रोटे.प्रोफे.सुप्रिया नलावडे, खजिनदार रोटे.अॅड.गुरूनाथ पावसकर व सर्व रोटरी मेंबर्स नी हा उपक्रम राबवला जावा हे सर्वानुमते ठरवले.
डॅा विद्याधर तायशेटे यांच्या मातोश्री कै.सुधा वसंत तायशेटे यांच्या जन्म दिन २६ जुलै , याचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रममधील बांधव व सेवा कार्यकर्त्यांकडून कणकवली उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आज स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. दोन अडीच तास चाललेल्या या मोहिमेत रुग्णालयाच्या सभोवताली स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेच्या संयोजनात उपजिल्हा रुग्णालय कणकवली चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी आणि डॉ. विद्याधर तायशेटे व जीवन आनंद संस्थेच्या संविताश्रम चे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे , स्वयंसेवक शैलेन्द्र कदम,संतोष नाईक यांचेसह आशिकी राणे, महेश व मयुरी लोट, सचिन सावंत, विजय नाईक व बांधव राजेश सावंत, संदेश करवणकर, शेखर जोशी, सोनी फर्नांडिस, ज्युड भगीणी सुप्रिया, सुनिता कदम, सेजल, सरिता , महादेवी, पूर्वा यांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला .
उप जिल्हा रुग्णालयाचा सर्व परिसर स्वच्छ झाल्याबद्दल अधिक्षक डॅा रेड्डी यांनी डॅा.विद्याधर तायशेटे , रोटरी क्लब कणकवली सेंट्रल , नगरपंचायत कणकवली व सविताश्रम संस्थेचे आभार मानले.