श्री विद्या क्लासचे संचालक मिलिंद सामंत यांचे निधन

आज दुपारी आशिये येथे होणार अंत्यसंस्कार
कणकवली शहरातील श्री विद्या क्लासेस चे संचालक व आशिये गावचे रहिवासी मिलिंद कमलाकर सामंत (वय 52) यांचे आज शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ मुळे त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्री विद्या क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर आज आशिये येथील स्मशानभूमीत दुपारी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कणकवलीतील सीए अमोल खानोलकर यांचे ते मामेभाऊ होत.
दिगंबर वालावलकर कणकवली