लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूल खारेपाटण चा ३ रा वर्धापन दिन संपन्न

लिटिल स्टार प्री प्रायमरी फनस्कुल, खारेपाटण चा ३ रा वर्धापन दिन सोहळा नुकताच संपन्न झाला.
दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्धापन दिनानिम्मित केक कापण्यात आला. वर्धापन दिना निम्मित विद्यार्थ्याचे विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धेचे चे सर्टिफिकेट मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले.
सरपंच इस्वलकर मॅडम कडून मुलांना खाऊ देण्यात आले. मुलांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी
सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच मयूर गुरव, वीरेंद्र चिके, गोट्या कोळसुलकर,पालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या संचालिका सौ.ऋतुजा राजेंद्र चिके यांनी सर्वांचे आभार मानले.





