डॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळेत देशी गोवंश संवर्धन व जतन दिन व वृक्षारोपण, जतन, संवर्धन व समृद्ध गोशाळा कार्यक्रम उत्साहात साजरा

डॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळा, तोंडवली येथे २२ जुलै २०२५ रोजी ‘देशी गोवंश संवर्धन व जतन दिन’ मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशी गायीच्या विधिवत पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात देशी गाईंच्या संवर्धनासाठी जनजागृती, पौष्टिक चारा, गोशाळेतील व्यवस्थापन, आरोग्य तपासणी व औषधोपचार यावर मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. कीर्ती नागवेकर यांनी गोशाळा स्थापनेचा उद्देश, त्यामागील प्रेरणा, शाश्वत व्यवस्थापन, तसेच गोवंश आधारित शेतीसाठी गोशाळेचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली.
‘देशी गोवंश संवर्धन व जतन दिन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. समीर बिलोलीकर ,जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या शुभ हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात गोशाळा करत असलेल्या कार्याची प्रशंसा करत शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच सध्याच्या काळात देशी गाईंच्या संवर्धनासाठी जनजागृती, पौष्टिक चारा, गोशाळेतील व्यवस्थापन, आरोग्य तपासणी व औषधोपचार तसेच गोवंशाच्या देखभालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य मा. श्री. दीपक भगत उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. किर्ती नागवेकर व डॉ. अनंत नागवेकर हे देशी गोवंश वाचविण्याचे उल्लेखनीय कार्य करत असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले आणि त्यांच्या कामास शुभेच्छा दिल्या. गोकुळ गोशाळा कोकण कपिला गोवंश संवर्धनाचे कार्य करत असून त्यांना आयोगाकडून योग्य ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुण्या ग्रामपंचायत तोंडवलीच्या सरपंच सौ. मनाली मंदार गुरव यांनी ग्रामपंचायतच्या वतीने गोशाळेस सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी डॉ. ज्योती खरे सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, कणकवली व डॉ. श्रीरंग प्रभू सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, कणकवली , श्रीम.मिनाक्क्षी झेमणे पशुधन पर्यवेक्षक नांदगांव उपस्थित होते.
या वेळी वृक्षारोपण, जतन, संवर्धन व समृद्ध गोशाळा या उपक्रमांतर्गत भगवान श्रीकृष्ण यांना प्रिय असलेल्या कदंब वृक्षाचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. कीर्ती नागवेकर व डॉ. अनंत नागवेकर यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उमेश सावंत यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दळवी, श्री. विवेक आडकर, आदित्य घाडीगावकर अमोल साटम,मनीष सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.