आयडियल स्टडी ॲप चे वितरण.

रोटरी क्लब सिंधुदुर्ग आणि रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचा उपक्रम
कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षक संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स वरवडे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास सुलभ व्हावा त्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने Ideal Study App चा वितरण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमात आयडियल स्टडी ॲपची संकल्पना सिंधुदुर्गात राबविणे विषयीचा आपला उद्देश रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचे माजी अध्यक्ष रोटरीयन श्री.अलंकार तायशेटे यांनी सांगितला. तर रोटरी क्लब सिंधुदुर्ग चे गव्हर्नर एरिया ए डी डॉ. विद्याधर तायशेटे,असिस्टंट गव्हर्नर रोटरी श्री. सचिन मदने,तसेच असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते,रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचे सचिव रोटरियन श्री.अजय जैन यांनी मुलांशी संवाद साधला या ॲपचे निर्माते पुणे रोटरी क्लबचे श्री.अमोल कामत यांनी या ॲपविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगत त्याच्या माध्यमातून अभ्यास किती सोपा होतो हे सांगितले.
यानंतर तालुक्यातील खारेपाटण हायस्कूल, मुटाट हायस्कूल, ल. गो. सामंत विद्यालय, नांदगाव हायस्कूल,आहे एस. एम. हायस्कूलच्या प्रतिनिधीना Ideal Study App ची सबक्रिप्शन कार्ड वितरित करण्यात आली
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आयडियल स्टडी ॲप चे निर्माते श्री.अमोल कामत,गव्हर्नर एरिया A D आणि ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, असिस्टंट गव्हर्नर श्री.सचिन मदने, डॉ.प्रशांत कोलते, रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचे अध्यक्ष अंकित रय्यानी, सेक्रेटरी श्री.अजय जैन,खजिनदार विजय होजहाला,माजी अध्यक्ष श्री.अलंकार तायशेटे,देवगड रोटरी क्लबचे श्री.अनिल अंधारी, वैभववाडी रोटरी अध्यक्ष श्री.सचिन रावराणे कणकवली रोटरी चे श्री.नितीन बांदेकर, श्री. बेलवलकर, मेगा गांगण मॅडम, वर्षा बांदेकर मॅडम,दीक्षा अंधारी मॅडम तसेच रोटरी चे सदस्य, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटकर सर यांनी केले