सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेता संघटनेकडून सीए झालेल्या श्वेता सामंत हिचा सत्कार

कठीण काळात मिळविलेल्या यशा बद्दल केले कौतुक
सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी नुकतीच सीए झालेल्या श्वेता सतीश सामंत हिची तिच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन तिचा सत्कार केला. कणकवली येथील निलिशा होम एप्लियन्सेसच्या सौ. मृणाल ठाकूर, आर के इलेक्ट्रॉनिक्स, मालवणचे हेमचंद्र कोयंडे, (सिंधुदुर्ग जिल्हा डीलर असोसिएशनचे सचिव,), पुजारी इलेक्ट्रॉनिक्सचे अशोक पुजारी, वन पॉईंट इलेक्ट्रॉनिक्सचे क्षितिज कोरगावकर, राणे इलेक्ट्रिकल, फोंडाघाटचे अलंकार रावराणे आदी उपस्थित होते. श्वेता हिचे वडील कै. सतीश सामंत हे स्वतः इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रथितयश व्यापारी होते. त्यामुळे त्यांचे या व्यापारी बंधूंशी अत्यंत चांगले संबंध होते.
श्वेता हिने ज्या कठीण परिस्थितीत एकाग्रपणे अभ्यास केला. ते सर्वांना जमते असे नाही. तर कित्येकजण अनेक वेळा ही परीक्षा देत असतात असे गौरवोद्गार श्री. हेमचंद्र कोयंडे यांनी काढले. सर्व व्यापारी बंधूंनी श्वेता हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.