आयडियल इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कणकवली/मयूर ठाकूर

इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेचे कु. सोनम संतोष अरकराव, कु.यश देऊ पवार, कु.तनय सिद्धेश नातू आणि कु.सारा राजू शिंगाडे हे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
यामध्ये 71.62% गुण मिळवत कु.सोनम अरकराव ही ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्ह्यात 8 वी, तर कु.यश देऊ पवार 69. 59% गुण मिळवत जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण मध्ये 13 वा आला, तर सिद्धेश नातू 61.48 गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण मध्ये जिल्ह्यात 45 वा आला, ग्रामीण अनुसूचित जातींमधून कु.सारा राजू शिंगाडे 54.05% गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार डी.पी तानावडे सर ,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!