असलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल

कणकवली तालुक्यात ३७ विकास संस्थांमध्ये असलदे सोसायटी ठरली एकमेव पात्र

शेतकरी सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती

चेअरमन भगवान लोके यांचे प्रतिपादन

कणकवली तालुक्यात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने भात पिक , शेती कर्ज , आंबा , काजू पिक कर्ज , गृह कर्ज , शैक्षणिक कर्ज , घरदुरुस्ती कर्ज , लग्नकार्य कर्ज, शेती अवजारे कर्ज योजना सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. कणकवली तालुक्यात ३७ विकास संस्थांमध्ये बॅंक स्तर व संस्था पातळीवर असलदे सोसायटी एकमेव पात्र ठरली आहे. असलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल ठरल्याने यशाचे सातत्य कायम राखण्यात यश आले आहे. असलदे सोसायटीच्या शेतकरी सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती होत असल्याची माहिती चेअरमन भगवान लोके यांनी व्यक्त केली आहे.

असलदे सोसायटीची मासिक सभा रामेश्वर सभागृहात चेअरमन भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी व्हा.चेअरमन दयानंद हडकर ,सरपंच चंद्रकांत डामरे,संचालक छत्रुघ्न डामरे,विठ्ठल खरात,श्यामराव परब,परशुराम परब,पत्रकार नरेंद्र हडकर,रघुनाथ लोके,विजय आचरेकर,सोसायटी सचिव अजय गोसावी,सत्यवान घाडी,प्रकाश वाळके,गौरी लोके आदी होते.

या संस्थेचे कर्ज व्यवहार आता 68 लाख 2 हजार 735 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये 74 सभासदांना भातपिक कर्ज – 20 लाख 52 हजार 600 रुपये , 9 सभासदांना आंबा पिक कर्ज – 6 लाख 81 हजार रुपये , 23 सभासदांना काजू पिक कर्ज – 17 लाख 6 हजार 500 रुपये , 18 सभासदांना अल्पमुदत बिगरशेती कर्ज – 3 लाख 86 हजार रुपये , मध्य व दीर्घ मुदत कर्ज – शैक्षणिक कर्ज – 4 लाख 26 हजार 800 रुपये , गृह खरेदी कर्ज – 7 लाख 70 हजार रुपये, लग्नकार्य कर्ज – 91 हजार 157 रुपये , शेती अवजारे खरेदी कर्ज – 28 हजार 770 रुपये , घर दुरुस्ती कर्ज – 6 लाख 59 हजार 908 रुपये असे 7 सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. सोसायटीच्या माध्यमातून एकूण 131 सभासदांना 68 लाख 2 हजार 735 कर्ज वाटप करण्यात आले असून संस्थेची उलाढाल 75 लाखांवर सभासदांच्या विश्वासामुळे पोहोचली असल्याचे चेअरमन भगवान लोके यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी , बँकेचे तज्ञ संचालक तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली असलदे सारख्या छोट्याशा गावामध्ये गेल्या 4 वर्षात संस्थेची उलाढाल वाढलेली असून संस्थेची प्रगती होत आहे. अन्य बॅंकांकडे असलेले शेती पिक कर्ज गावातील कर्जदार पुन्हा सोसायटीकडे वळलेले आहेत. शेतक-यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असलदे सोसायटीच्या माध्यमातून केला जात आहे.सर्व गावातील सोसायटीच्या कर्जदारांनी संचालक मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली कर्जे भरुन 100 टक्के वसुली पात्र करण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 224 संस्थांमध्ये केवळ 7 संस्था बॅंक व संस्था पातळीवर कर्ज वसुलीत पात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यात बॅंक स्तर व संस्था पातळीवर 37 संस्थांमध्ये असलदे सोसायटी ही एकमेव संस्था 100 टक्के कर्ज वसुली पात्र ठरली असल्याचे चेअरमन भगवान लोके यांनी सांगितले.
या संस्थेचे कामकाम सातत्याने यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , उदय परब , शामु परब , विठ्ठल खरात , प्रकाश खरात , कांचन लोके , अनंत तांबे , संतोष परब , सुनिता नरे , सचिव अजय गोसावी आदींनी मेहनत घेतली आहे. तसेच बॅंक तालुका विकास अधिकारी डी.आर.गवाणकर , विकास अधिकारी राजू सावंत, ए.के. सावंत, ए.बी.दळवी यांनी संस्था 100 टक्के कर्ज वसुली होण्यासाठी मार्गदर्शन केले, असे श्री. लोके यांनी सांगितले.

error: Content is protected !!