बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेत गौरव सावंत चे यश

तालुक्यातील वागदे आर्यादुर्ग सोसायटी येथील गौरव गीता गणेश सावंत याने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून प्राप्त करत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड येथील कॉलेजमध्ये गौरव यांनी आर्किटेक्चर ची परीक्षा दिली. या परीक्षेत तो विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाला. गौरव सावंत याचे दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश स्कूल वरवडे येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण कणकवली कॉलेज कणकवली येथे झाले होते. या यशाचे श्रेय गौरव याने आई, वडील, आजी, आजोबा आणि शिक्षकांना दिले आहे. आईचे विशेष मार्गदर्शन मिळाल्याने आपण हे यश संपादन करू शकलो ,असे गौरव याने सांगितले. गौरवची आई जीएसटी भवन कोल्हापूर येथे जीएसटी इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. तर त्याच्या वडिलांचे कणकवली येथे टू व्हीलर दुरुस्तीचे गॅरेज आहे. गौरव सावंत याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या आई-वडिलांना अभिमान आहे.

error: Content is protected !!