आमदार निलेश राणे यांच्या कडून अपघातात मृतरिक्षा व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

भेट देत केले चारही रिक्षा व्यावसायिकांच्या कुटूंबियांचे सात्वन
नारिंग्रे येथे झालेल्या रिक्षा अपघातात आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचे निधन झाले होते. याबाबत शनिवारी आमदार निलेश राणे यांनी आचरा येथे येत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच कायम त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,दिपक पाटकर, तालुकाध्यक्ष बाईत, संतोष कोदे, उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर,डॉक्टर प्रमोद कोळंबकर
ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडी,चंदू कदम, तसेच मनोज हडकर,बाबू कदम,चंदू सावंत, अभिजित सावंत, अजित घाडी,अभय भोसले,भाऊ हडकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.