आचरा रस्त्यावर पोलिस स्टेशन जवळ वडाची फांदी पडून वाहतूक काही वेळ बंद

ग्रा. प . सदस्य अनुप वारंग व ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुरतकर यांच्याकडून तातडीने कारवाई

आज सोमवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसामुळे दुपारी 12.30 च्या सुमारास कलमठ आचरा रोडवर पोलिस स्टेशन जवळ वडाच्या झाडाची मोठी फांदी पडून अकरा रस्ता काही वेळे पुरता बंद झाला होता. याबाबत माहिती मिळताच कलमठ ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत झाडाच्या फ़ांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

error: Content is protected !!