इंडियन टॅलेंट ऑलिन्पियाड परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूल ची ख़ुशी विशाल आमडोसकर ठरली सुवर्णं पदकाची मानकरी.

कणकवली/मयूर ठाकूर
गत वर्षी घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिन्पियाड परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे च्या कु.ख़ुशी विशाल आमडोसकर इयत्ता 10 वी च्या विध्यार्थिनीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 20 वा क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे.
या परीक्षेत दरवर्षी आयडियल इंग्लिश स्कूल चे विध्यार्थी दरवर्षी नेत्रदीपक यश मिळवतात. खुशी आमडोसकर हिने राज्यात हा क्रमांक पटकावत आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या यशाबद्दल नुकताच खुशीचा सन्मान ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, को ओरडीनेटर श्री.निलेश घेवारी, एच. ओ. डी. सौ.वैष्णवी मोरेवकर, स्पर्धा परीक्षा प्रमुख सौ.सायली पाताडे यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्राध्यापक श्री. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.