वायंगणी हायस्कूलचा शिक्षण तज्ञ “कै. वसंत दिनकर मेस्त्री बेस्ट स्टुडंट् शिष्यवृत्ती अवार्ड” मंजिरी घाडीगांवकरला

सुविद्या इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी संचालक प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते शिष्यवृत्ती अवार्ड देऊन गौरव

आचरा –

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेने नुकताच प्रशालेचे माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय किर्तीचे उद्योजक तथा राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या हस्ते सन्मानित झालेले, सुविद्या इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक, शिक्षणतज्ञ कै. वसंत दिनकर मेस्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा “कै. वसंत दिनकर मेस्त्री बेस्ट स्टुडंट अवार्ड” या प्रशालेतून मार्च-२०२५ मध्ये झालेल्या एस. एस. सी परीक्षेमध्ये प्रशालेत प्रथम व आचरा केंद्रात द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या कु. मंजिरी पुरुषोत्तम घाडीगांवकर हिला सुविद्या इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी संचालक तथा कै. वसंत मेस्त्री यांचे बंधू, उद्योजक प्रकाश दिनकर मेस्त्री यांच्या हस्ते रु. ५५५५/-चा धनादेश, उदयोन्मुख कला शिक्षक मोरेश्वर गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत कु. मंजिरी हिला सोमवार १६ जून रोजी प्रदान करण्यात आला. सुविद्या इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात विविधांगी उपक्रम राबवित जात असून व्यवस्थापकीय संचालक वर्षा मेस्त्री यांचे यासाठी बहुमोल सहकार्य लाभत आहे.

यावर्षी इ. १० वी तील हुशार व होतकर, अशा दोन विद्यार्थ्यांना कै. वसंत मेस्री यांच्या नावे दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण वर्षभराचा खर्च मेस्त्री परिवाराकडून व सुविधा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेकडून करण्यात येणार आहे. कु. विघ्नेश पाटील व कु. तमन्ना सावंत या दोघांना या वर्षीचा या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक द. जा. टकले, संजय जाधव, प्रभा बांवकर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी, संस्था चालक विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक टकले यांनी मेस्त्री परिवार, उपस्थित पालकवर्ग, संस्थाचालक यांचे आभार माणून कार्यक्रमाची सांगता केली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने नवागतांचे जल्लोषात स्वागत यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!