ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व त्यावेळच्या सिंधूगर्जना साप्ताहिकाचे संपादक मालक, आनंद विठ्ठल अंधारी (वय 93) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज मोबाईलचे मालक संतोष अंधारी व कणकवलीतील जुने राज इलेक्ट्रॉनिक्स चे मालक प्रदीप अंधारी यांचे ते वडील होत.
कणकवली प्रतिनिधी