ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये नवागतांचे दिमाखात स्वागत.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे इथे नावागतांचे स्वागत प्रशालेत उत्साहात संपन्न झाले. छोट्या चिमुकल्या मुलांनी नव्याने शाळेत प्रवेश करताना आपल्या फिंगर प्रिंट ( हाताचे ठसे ) कार्डशिटवर उमटवत नवीन शाळा प्रवेशाची दिमाखात सुरुवात केली.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवे मित्र,मैत्रिणी, आणि नवा वर्ग हे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये दिसत होते.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लेझीम ढोल तसेच मिकी माउस ने ही हजेरी लावली होती. पावसाच्या वर्षावात शाळेतील पहिल्या दिवसाचा आनंद अजूनच द्विगुणित केला.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर, श्री. यज्ञेश शिर्के सर सल्लागार डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम यांच्या शुभ हस्ते सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कॉलेज विध्यार्थिनी आस्था सामंत व शिक्षिका ऋषीका वर्दम यांनी आयडियलच्या यशाची यशोगाथा उलघडली.त्याचप्रमाणे सर्व पालकांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तयेशेटे सर, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर , सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर सर, खजिनदार सौ शीतल सावंत मॅडम ,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!