कणकवली बाजारपेठेत रस्त्यावरील अतिक्रमणांची मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षकांसह संयुक्त पाहणी

कणकवली तालुका व्यापारी संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित

अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्यानंतर पुढील कार्यवाही होणार

कणकवली बाजारपेठेत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या सह पोलीस निरीक्षक मारुती जगताप व व्यापारी वसंघाच्या प्रतिनिधी मार्फत आज संयुक्त पाहणी करत सर्वेक्षण करण्यात आले. नुकत्याच पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. या पाहणी दरम्यान बाजारपेठेत रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात येणार असून या नोटिसा दिल्यानंतर पुढील प्रक्रियेंती रस्त्यावरील अतिक्रमण हटाव कारवाई हाती घेतली जाणार आहे. दरम्यान कणकवली नगरपंचायत च्या बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमणे असल्यास ती मागे हटवा असेही आवाहन यादरम्यान करण्यात आले आहे. दरम्यान या पाहणी दरम्यान व्यापारी संघाचे राजू पारकर, विलास कोरगावकर, राजेश राज्याध्यक्ष, दीपक बेलवलकर, शेखर गणपत्ये यांच्यासह नगरपंचायतचे रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, तुषार कांबळे अन्य उपस्थित होते. कणकवली मुख्य चौक येथून रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली व सूचना दिल्या. आज कारवाई होणार या शक्यतेने सकाळपासूनच अनेक दुकानदारांनी आपली दुकाने गटाराच्या आत मध्ये लावलेले चित्र सकाळपासून दिसत होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!