आचरा पिरावाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

आचरा-अर्जुन बापर्डेकर
रविवारी रात्री सोसाट्याच्या वारयासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरा
पिरावाडी येथील मुरलीधर सुर्यकांत कोळबकर यांचे घरावर उडील वृक्ष पडून अंदाजे 90 हजारांच्या आसपास नुकसान झाले आहे ही घटना पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास घडली

सदर घटनेची खबर पोलीस पाटील पिरावाडी तन्वी जगनाथ जोशी यांनी महसुल व ग्राम प्रशासनाला दिली घटनेची खबर मिळताच आचरा सरपंच जेरॉन फर्नाडीस ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, प्रतिक्षा सारंग यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली

error: Content is protected !!