वीज समस्येबाबत आचरावासिय संतप्त

चार तास घेरावा घालत

उपकार्यकारी अभियंत्यांना धरले धारेवर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या आक्रमक पवित्र्याने तातडीने कर्मचारी उपलब्ध करून देण्याची अधिक्षक अभियंत्याची ग्वाही
आचरा–अर्जुन बापर्डेकर
दुर्घटना घडूनही वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने संतप्त आचरा वासियांनीसोमवारी सकाळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत आचरा बाजारपेठ येथील विजवितरण कार्यालयावर धडक देत तासाभराने आलेल्या उपकार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले.आंदोलनाची खबर समजताच उपस्थित झालेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी
आचरा सारख्या मोठ्या गावात तारा तुटल्या तर वीज कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाही.वीजेचा शाॅक लागून म्हैस मरुन तीन दिवस झाले तरी वीज मंडळाचे कर्मचारी पोहोचत नाहीत.गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले माणूसकी म्हणून शिल्लक आहे का मस्तवाल झालात का अशा शब्दात फोनवरून अधिक्षक अभियंत्यांना झापत आजच्या आज आचरे गावासाठी सहाय्यक अभियंता आणि लाईनमन उपलब्ध करून देण्याची मागणी केली.याबाबत आज लाईनमन आणि दोन दिवसांत सहाय्यक अभियंता उपलब्ध करून देण्याचे अधिक्षक अभियंता राख यांनी ग्वाही दिल्यामुळे संतप्त आचरा वासियांतर्फे चार तास सुरू असलेले आंदोलन मागे घेत तातडीने कर्मचारी उपलब्ध न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
रविवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील व्यापारी अभिजित सावंत यांच्या पत्र्याच्या शेडवर वायर तुटून पडूनही विद्यूत प्रवाह सुरू राहिल्याने धोका निर्माण झाला होता.याबाबत विद्यूत कर्मचाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर कुणीही वेळेवर उपलब्ध होवू शकले नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत आचरा बाजारपेठ येथील विद्यूत वितरण कार्यालयात धडक दिली.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत,जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंद्रकांत कदम,महेंद्र घाडी, तसेच राजन पांगे,वामन आचरेकर,सुनील दुखंडे,विजय कदम,मंदार सरजोशी,अभिजीत सावंत, सिद्धार्थ कोळगे,जगदिश पांगे,श्रीपाद सावंत,संजय आचरेकर,देवेंद्र नलावडे निखिल ढेकणे,अरुण आपकर,मंगेश मेस्त्री,परबयांस बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.मात्र तासभर होवूनही कोणी
मात्र जबाबदार अधिकारीच नसल्याने सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी उपकार्यकारी अभियंता लिमकर यांना फोन करुन आपण उपस्थित होत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हालणार नसल्याचे सांगितले.काही वेळाने आलेल्या सहाय्यक अभियंता ओम शिंदे यांनाही ग्रामस्थांनी धारेवर धरत तुम्ही आमच्या प्रश्नांची जबाबदारीने उत्तर देणार का असे विचारत धारेवर धरले. बरयाच वेळाने आलेल्या लिमकर यांना ही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.आंदोलनाची खबर मिळताच उपस्थित झालेले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी गरीब शेतकरी राधाकृष्ण आंबेरकर यांची विद्यूत तारेच्या स्पर्शाने म्हैस मरुन पडून तीन दिवस झाले तरी कुणीही विद्यूत मंडळाचा अधिकारी कर्मचारी उपस्थित राहू शकला नसल्याचे समजताच फोन वरुन अधिक्षक अभियंता राख यांना फोनवरून कडक शब्दात समज देत आचरे गावासाठी आजच्या आज विद्यूत कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.सामंत यांच्या मागणीनुसार आज लाईनमन तर दोन दिवसांत सहाय्यक अभियंता उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्यानंतर तातडीने कर्मचारी उपलब्ध न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देत आचरा वासियांनी चार तास सुरू असलेले आंदोलन मागे घेतले
आमदार निलेश राणे यांच्या तर्फे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास तातडीची मदत
आंदोलन मागे घेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विद्यूत अधिका-यांसह मृत म्हैशीची पहाणी करत तातडीने पंचनामा करण्याची सुचना केली.तसेच ऐन शेती हंगामात दुभते जनावर मरून नुकसान ग्रस्त झालेले शेतकरी राधाकृष्ण आंबेरकर यांना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रोख दहा हजार तातडीची मदत देत आर्थिक सहाय्य केले.यावेळी त्यांच्या सोबत सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी,दिपक पाटकर,मनोज हडकर यांसह अन्य ग्रामस्थ, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!