राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पत्नी सौ.हूमेरा अबिद नाईक यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा.

प्रशालेच्या पहिल्या दिवशी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नंबर पाच येथे विविध शालोपयोगी भेट वस्तूंचे वाटप.

कणकवली/मयूर ठाकूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात.राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं मोलाच योगदान दिलेल आहे.शिक्षण हा त्यांच्यासाठी समाज उभारणीचा केंद्रबिंदू असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत कार्य ते नेहमीच करीत असतात.
कणकवली शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 05 ही मराठी शाळा जिल्ह्यात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून ओळखली जाते.या प्रशालेच्या नूतनीकरणासाठी अबिद नाईक यांनी महत्त्वाची भूमिका घेत जिल्हा जियोजन समितीच्या निधीमधून 20 लाख रुपये तसेच वैयक्तिक निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसज्ज असे शिक्षण मंदिर उभे करून दिले आहे.आज राज्याच्या सर्वच प्राथमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे आणि या निमित्त प्रशालेमध्ये शैक्षणिक उपक्रमांच आयोजन जि.प पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 05 येथे करण्यात आलं होत.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पत्नी सौ.हूमेरा अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेत विविध शालेय भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.प्रसंगी इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्यांचे स्वागत देखील करण्यात आले.शासनाच्या माध्यमातून मिळणारा गणवेश,विद्यार्थ्यांसाठी बूट,सॉक्स,शालेय पुस्तके इत्यादींचे वितरण देखील या निमित्ताने करण्यात आले.वह्या वाटपाचा कार्यक्रम देखील प्रशालेत संपन्न झाला असून अबिद नाईक यांच्यामार्फत प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन उत्तेजित करण्यात आले.प्रसंगी शाळेतील शिक्षकांनी सौ.हूमेरा अबिद नाईक यांचा वाढदिवस उपस्थित पालक विद्यार्थी यांच्या समवेत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला.
प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,सौ.हूमेरा अबिद नाईक,कु.इक्रा अबिद नाईक,कु.रिजा अबिद नाईक,प्रशालेच्या मुख्याध्यापक श्रीम.कल्पना मलये,उपशिक्षक शर्मिला चव्हाण,सहाय्यक शिक्षक विशाखा धुमाळे,माजी विद्यार्थी समीक्षा कोरगावकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केतकी दळवी,शिक्षणप्रेमी उज्वला जावडेकर,अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर,मदतनीस सोनाली बिबवणेकर,स्वयंपाकी संदिषा शिगवण,रसिका मिराशी आणि पालक वर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सखी सावित्री समिती सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!