कणकवलीत उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर आरटीओ आणि पोलीस विभागाची धडक कारवाई

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या होत्या सूचना

कणकवली शहरात उड्डाण पुलाखाली लावण्यात आलेल्या अनधिकृत पार्किंग करण्यात आलेल्या ट्रॅक्टर ,डंपर, जेसीबी कार यांच्यावर आरटीओ आणि पोलीस विभागाची धडक कारवाई सुरू केली. कणकवली नरडवे नाक्या पासून ही कारवाई सुरू केली आहे. काल पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली शहरातील विविध समस्या संदर्भात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी कणकवली शहरातील पुलाखाली अनधिकृत पार्किंग मुळे वाहतुकीस अडथळा होणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज लगेचच या कारवाईला सुरुवात झाली.

error: Content is protected !!