विद्यूत अभियंता मठकर यांचे काम कौतुकास्पद–सरपंच जेराॅन फर्नांडीस

वीज समस्यां सोडविण्यासाठी स्वत:कर्मचाऱ्यांसोबत काम करणारे विद्यूत अभियंता अनिल मठकर यांचे काम कौतुकास्पदच आहे. त्यांच्या बदलीमुळे आम्हाला कायम त्यांची उणीव जाणवेल असे मत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी ग्रामपंचायत आचरा येथे व्यक्त केले.
आपल्या कार्यतत्परतेने गेली दोन वर्षे नेहमी वीज समस्या निवारणासाठी झटणारे अधिकारी म्हणून ख्याती मिळवलेले आचरा येथे कार्यरत सहाय्यक अभियंता अनिल मठकर यांच्या बदलीनिमित्त आचरा ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर,परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, नरेश परब,अजित घाडी, संदिप पांगम, निखिल ढेकणे, सौमित्र राणे,पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मठकर यांनी येथील ग्रामस्थांचे प्रेम आपुलकी मुळे काम करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.नेहमी सहकार्य देणारे आचरे सारखे दुसरे गाव नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी अर्जुन बापर्डेकर, मंदार सांबारी यांनी ही मठकर यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी
सरपंच जेराॅन फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, यांच्या तर्फे मठकर यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!