कणकवली आचरा रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईमुळे रस्ता वाहतुकीस बंद

भर पावसात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

वरवडे नदीवरील पुलाचे काम रखडले

प्रशासन सुस्त, पावसामुळे नागरिकांना वळसा घालून जावे लागणार

कणकवली आचरा मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. पावसापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते मात्र ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे हे काम रखडले आहे. त्यातच या रस्त्यावर अक्षरशा चिखलमय वातावरण झाले असून याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर वरवडे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान पावसाच्या पूर्वी हे काम करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाकडून हालचाली होणे अपेक्षित होते मात्र याबाबत गांभीर्याने उपाययोजना झाली नसल्याने हा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

error: Content is protected !!