विहिरीत पडलेल्या सापाला जिवदान

कणकवली बांधकरवाडी येथील घटना
कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंट सोसायटीच्या आवारातील विहिरीत भक्ष्याच्या शोधात आलेला साप पडला होता.येथील रहिवाशांच्या हि गोष्ट लक्षात येताच उदय करंबेळकर यांनी पुढाकार घेतसर्प मित्र यश वर्दंम आणि गुरुदास करंबेळकर आणि त्यांचे सहकारी यांना पाचारण केले.त्यांनी विहिरीत उतरुन सर्पाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.यावेळी उदय करंबेळकर ,डेगवेकर काका,सौ सविता डेगवेकर,यश राणे जयेश सावंत आदी कोरल सोसायटी मेंबर्स उपस्थित होते.