नडगिवे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल १०० % निकाल ..

ईशा मोहसीन गिरकर ९३.२ गुण मिळवून प्रथम
आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंगजी माध्यमाच्या शाळेच्या १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून शालेय विद्यार्थीनी कु.ईशा मोहसीन गिरकर ही ९३.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. तर फहाद हसनमिया सारंग याने ९२.८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर सुजल रामचंद्र माहतो या विद्यार्थ्याने ९२.२ टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज गुळेकर मुख्याध्यापिका श्रीम. डांगे यांनी अभिनंदन केले आहे.
यंदा घेण्यात आलेल्या १० वी बोर्ड परीक्षेत नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ९ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती.हे सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले.त्यामुळे शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.