सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचाऱ्यांच्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

कणकवली/मयूर ठाकूर
१ मे कामगार दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटना,सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिराच उद्घाटन कणकवली गोपुरी आश्रम येथे ज्येष्ठ पत्रकार श्री.संतोष वायंगणकर यांच्या हस्ते केलं.
औषध कर्मचाऱ्यांची एकी आणि संघटनेच कार्य हे वाखाणण्या सारखं आहे तसेच त्यांनी कोरोना सारख्या आणि बऱ्याच वेळा आपत्ती येते तेव्हा सुद्धा औषध कर्मचारी जबाबदारीने काम करतात असे गौरोदगार कर्मचाऱ्यांप्रती श्री.वायंगणकर यांनी काढलेत.यावेळी व्यासपीठावर डॉ.गजानन मोतीफळे,संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.समीर ठाकूर,सचिव श्री.अभिजीत गुरव,उपाध्यक्ष श्री.साईश अंधारी,खजिनदार श्री.शेखर कुंभार तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष,ज्येष्ठ कर्मचारी हे उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्याना संघटनेकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी दीपक घाडीगावकर,दीपक मेस्त्री, तसेच कणकवली तालुक्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं.