आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या आदित्य नेताजी चौगुले याची राष्ट्रीय सैनिक स्कूल मध्ये निवड.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे प्रशालेचा इयत्ता 5 वी चा विध्यार्थी आदित्य नेताजी चौगुले याची बेळगांव येथील राष्ट्रीय सैनिक स्कूल मध्ये निवड झाली आहे.
देशात एकूण 5 सैनिक स्कूल आहेत त्यापैकी बेळगाव येथील सैनिक स्कूल मध्ये सिंधुदुर्गातील आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या एकमेव विध्यार्थ्यांची निवड झाली आहें.
आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये मार्शल आर्ट कमांडो ट्रेनिंग च्या माध्यमातून मुलांना पाहिली पासूनच नेमबाजी, तलवारबाजी, रायफल शूटिंग, मल्लखांब अशा प्रशिक्षणाचे प्राथमिक धडे दिले जातात. आणि त्यामुळेच अश्याप्रकारे विद्यार्थ्यांचे हे यश आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चा अभिमान आहें.
या यशाबद्दल आदित्य चे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर सर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी.तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.