ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांच्या सौजन्याने आचरा समुद्र किनारी बॅंच व्यवस्था

आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर उर्फ चावल मुजावर यांच्या पुढाकाराने आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था केली जात असून त्याचा लोकार्पण सोहळा रविवार ४मे रोजी आचरा बीच येथे संपन्न होत आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारया आचरा समुद्र किनारी पर्यटकांना बैठक व्यवस्थेसाठी ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी पुढाकार घेत बॅंच उपलब्ध केले आहेत.याचा लोकार्पण सोहळा आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चावल मुजावर यांनी केले आहे.