मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 27एप्रिल रोजी गोवा येथे होणार वितरण आचरा येथे होणार जल्लोषात स्वागत

आचरा पिरावाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यां आणि हॉटेल व्यावसायिक मिताली प्रशांत कोरगावकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांव चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे वितरण रविवार 27एप्रिल रोजी दुपारी 12वाजता मान्यवरांच्या हस्ते रविंद्र भवन गोवा साखळी येथे होणार आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीमती कोरगावकर या उद्योजिका असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत. बचत गट प्रमुख म्हणून महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्या कार्यरत आहेत. सागरीका बोट सफारी आचरा च्या त्या अध्यक्षा आहेत. दक्षता समिती सदस्य आहेत.तशाच यशराज प्रेरणा गृप आचरा च्या त्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा पुढाकार असतो.त्यांना या अगोदर 2022सालचा अष्टगंध पुरस्कार तसेच जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचा महिला गौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सोमवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पिरावाडी येथून ढोलपथकाच्या साथीने मिरवणूक काढून स्वागत करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.