साटेली भेडशी येथे एसटी आणि दुचाकीमध्ये अपघात

दोडामार्ग : साटेली भेडशी येथे आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान एसटी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. अपघातात दुचाकी चालक विजय गुरव आणि त्याच्या मागे बसलेले देविदास टोपले जखमी झाले .डाव्या बाजूने अचानक रस्त्यावर आलेल्या त्या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला.
दरम्यान, स्थानिकांनी चर्चा करून अपघात प्रकरण सामोपचाराने मिटवले. पोलिसांनी त्याबाबत अपघातातील जखमींकडून माहिती घेतली. अपघातग्रस्त एसटी दोडामार्गहून पाळयेला जात होती. तेथून सोनावलला जावून ती दहावीच्या विद्यार्थ्यांना येथे आणणार होती;पण तत्पूर्वीच त्या गाडीचा अपघात झाल्याने विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दुसरी गाडी पाठवण्यात आली.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / दोडामार्ग