डॉ.जालिंदर अडसुळे लिखीत… ‘लाईफ, टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्सःथिअरी अँड एक्स्पिरियन्स…पुस्तकाचे 16 एप्रिल रोजी प्रकाशन.

मुंबई प्रेस क्लब येथे होत आहे पुस्तकाचे प्रकाशन.
मुंबई: 11 एप्रिलः…समता शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य.डॉ.जालिंदर अडसुळे यांनी त्यांचे समाज कार्य अध्यापन आणि झोपडपट्टयानतील कम्युनिटी ऑरग्नायजिन्ग ( समुदाय संघटन ) च्या अनुभवांवर आधारित लिहिलेल्या ‘लाईफ , टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्सःथिअरी अँड एक्स्पिरियन्स.…या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक.16 एप्रिल, 2025 रोजी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मुंबई प्रेस क्लब मध्ये होत आहे.
डॉ.जालिंदर अडसुळे यांनी त्यांचे सारे आयुष्य निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क (मुंबई विद्यापीठ ) आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क (धुळे) (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) यांमधे समाजकार्य विद्यार्थ्यांना अद्यापन करीत आणि समाजातील दुर्बल घटक , विशेषतः मुंबईच्या झोपडपट्ट्यातील नागरिकांचे न्याय्य हक्क आणि सन्मानासाठीच्या चळवळीत व्यतीत केले.
सोशल वर्क कॉलेज मधील विद्यार्थ्यांकडून समाजकार्यातील, वस्ती कार्य थिअरीचे धडे गिरवून घेत असतानाच झोपडपट्टी तील नागरिकांचे हक्क आणि सन्मानासाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळीतील विविध प्रकल्प आणि उपक्रमांतून विद्यार्थ्यांना घडविले.
सद्यस्थितीत डॉ.अडसुळे हे राज्यभरातील अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त/सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.अडसुळे यांच्या कम्युनिटी ऑरग्नायजिन्ग थिअरीजचे अध्यापन आणि कार्यानुभवाचे संचित असलेले *लाईफ,टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्सःथिअरी अँड एक्स्पिरियन्स* ...हे पुस्तक
विलास वाघ मेमोरिअल फौंडेशन ने पुरस्कृत केले आहे. पुस्तक प्रकाशन सोहोळ्यासाठी विलास वाघ मेमोरिअल फौनडेशनच्या संचालिका प्रा.ऊषा वाघ यांचेसह निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क च्या माजी प्राचार्य डॉ.हेजल डिलीमा, मानवी हक्क विधिज्ञ अँड. मिहिर देसाई, प्रथम एज्युकेशन फौंडेशनच्या संस्थापिका प्रा.फरिदा लांबे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रा.अमिता भिडे, घर हक्क चळवळीतील कार्यकर्ते संजय शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रा.रचना अडसुळे
निमंत्रक
+91 98204 36006
डॉ.जालिंदर अडसुळे व विलास वाघ मेमोरिअल फौंडेशन… करिता….
किसन चौरे
9270785182





