जुन्या पेन्शन योजनेसाठी कणकवलीत तहसीलदार कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रवेशद्वारावर एकत्र येत कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना कणकवली तहसीलदार कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांनी आज टोल वाजवून जोरदार घोषणाबाजी केली व आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आर.एम.कांबळे जिल्हाध्यक्ष अंशदायी पेन्शन योजना व तालुकाध्यक्ष महसूल संघटना कणकवली, एन.एस लांबर अध्यक्ष तलाठी संघटना, कणकवली, श्रीकांत जाधव , रणजीत चौगुले, बापू जाधव, महादेव बाबर, सुचित्रा आडारकर, श्री. आव्हाड आदी सहभागी झाले होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!