आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आचरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

शिवजयंती निमित्त आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने आचरा येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी यांच्या उपस्थितीत रामेश्वर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी शिवसेनेचे जयप्रकाश परुळेकर, रुपेश पाटकर, अभय भोसले, चावल मुजावर, मांगिरीष सांबारी, पंकज आचरेकर, चंदू कदम, महेंद्र घाडी, विजय कदम, दिलीप कावले, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, यांसह मंगेश मेस्त्री, तोंडवळी तळाशिल येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते, डॉ. विपूल गांधी, निलेश म्हात्रे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. जिल्हा परीषद सदस्या वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या आयोजनातून शिवसेनेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ बहुसंख्य नेत्र रुग्णांनी घेतला.

error: Content is protected !!