पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते संजय नकाशे यांचे मित्रप्रेम जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न

स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना, सिंधुदुर्ग व संजय नकाशे मित्रपरिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना, सिंधुदुर्ग व संजय नकाशे मित्रपरिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा व श्री. संजय विठठल नकाशे यांचे मित्रप्रेम जनसंपर्क कार्यालय नूतन इमारतीचे उघ्दाटन सिंधुदुर्ग पालकमंत्री तथा मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे याच्या शुभहस्ते करण्यात आले.
भाजपा मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , महेश नारकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय नकाशे, नवनिर्वाचित जि. प. सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे माजी जि. प.सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर, नवनिर्वाचित पं.स. सदस्य सहदेव खाडये,हर्षदा वाळके,राजेश जाधव,बंटी रावराणे,सरपंच निशा नकाशे,श्रीरंग पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना.राणे बोलताना म्हणाले की,संजय नकाशे याचा संपर्क वर्षानुवर्ष आहे. समाजकारण व राजकारण यात प्रामाणिकपणे काम करणारे संजय नकाशे असून समाजात विविध घटकांना मदत करणारा एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यानी या कार्यालयातून जनसेवेची चांगली कामे करावीत असे सांगत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.तत्पूर्वी स्वीटलँड इंग्लिश मिडीयम स्कूल,तळेरे याचे मर्दानी खेळ होत, महिलांसाठी हळदीकुंकु व डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा रिया मेस्त्री विरूद्ध बुवा अंकिता गावडे याच्यासह ह.भ.प.मानसीताई बडवे याचे किर्तन होत कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमासाठी संजय नकाशे मित्र परिवार व स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना, सिंधुदुर्ग यानी विशेष मेहनत घेतली.





