भिरवंडे रामेश्वर मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन निधीतून पाच कोटी रुपये देणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन
मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
भिरवंडे रामेश्वर मंदिर बांधकाम सुरू आहे. या मंदिराच्या पर्यटन विकासासाठी निधी मिळावा म्हणून देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, सेक्रेटरी तुषार सावंत, संचालक संजय सावंत, संचालक अजित सावंत आदींनी काल पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मंदिराच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यावर चर्चा झाली. प्रादेशिक पर्यटनातून आपल्याला निधी दिला जाईल असे आश्वासन श्री. राणे यांनी दिले. यामध्ये मंदिराचे कंपाऊंड वॉल बांधकाम करणे, मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे, मंदिराच्या शेजारी तलाव बांधकाम करणे, गार्डन उभारणे, भक्तनिवास विस्तारित करणे, पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे, मंदिर परिसरातील रस्ता रुंदीकरण करणे, प्रवेशद्वार उभारणे, अद्यावत स्टेज बांधकाम करणे आणि
भक्तांसाठी महाप्रसाद स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे, वृक्ष संवर्धन करणे, दीपस्तंभ उभारणे अशा विविध कामांसाठी हा निधी दिला जाणार आहे. या निधीतून गार्डनमध्ये अद्यावत अशी लहान मुलांसाठी ट्रेन सुविधाही निर्माण करून पर्यटन दृष्ट्या विकास करणे असा उद्देश ठेवण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून विकास निधी दिला जाईल. तो ही तातडीने मंजूर करू असे आश्वासन दिले.





