खारेपाटण हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सेवेला नवीन वर्षात स्कूल बस दाखल….

माजी विद्यार्थी महेश शेट्ये यांचे विशेष सहकार्य

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व कै.प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण तसेच पूर्व प्राथमिक विभाग या सर्व विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयी करीता या शाळेचे माजी विद्यार्थी व साबा सॉफ्टवेअर व इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे फायनांस मनेजर श्री महेशजी शेट्ये यांनी या कंपनीच्या सी आर एस फंडातून सुमारे १८ सीटर मर्यादा असलेली स्कूल बस मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
आज रविवार दी.३० मार्च २०२५ रोजी मराठी नव वर्षाच्या शुभमुूहर्तावर गुडी पाडव्या दिवशी स्कूल बस चे देणगीदार व शाळेचे माजी विद्यार्थी श्री महेश शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण हायस्कूल येथे या नवीन स्कूल बस चे श्री शेट्ये यांचे शुभ हस्ते पूजन करण्यात आले.तर खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने स्कूल बस देणगीदार श्री महेश शेट्ये यांचे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे यांचे हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री भाऊ राणे,सरचिटणीस – श्री महेश कोळसुलकर,सह सचिव – राजेंद्र वरुणकर,खजिनदार – संदेश धुमाळे तसेच संस्थेचे विश्वस्त व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे सर, श्री मोहन कावळे,श्री विजय देसाई,श्री दादा कर्ले,श्री प्रशांत गुळेकर,दिगंबर राऊत,योगेश गोडवे, तसेच पत्रकार खारेपाटण पतपेढीचे संचालक श्री संतोष पाटणकर,संचलीका सौ श्रद्धा देसाई,माजी ग्रा.पं.सदस्य सौ सोनल लोकरे,ग्रामस्थ श्री शेखर राणे,श्री पराडकर,खारेपाटण हायस्कूल चे पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, खारेपाटण कॉलेजचे प्रा.दयानंद कोकाटे,श्री पाडवी सर,खारेपाटण हायस्कूल ग्रंथपाल श्री यशवंत रायबागाकर,श्री भिसे सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तर खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने स्कूल बस देणगीदार श्री महेश शेट्ये यांछा संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे यांचे शुभहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लवकरच या स्कूल बस चे लोकार्पण विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असल्याचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांचेकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!