जलयुक्त शिवार योजने मधून साकेडी मधील दोन विहिरींच्या कामाची भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या दोन्ही कामांसाठी झाला निधी मंजूर
गेली अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी लागणार मार्गी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील साकेडी येथील जलयुक्त शिवार योजने मधून ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 3 मधील मंजूर असलेल्या विहिरींच्या दोन कामांचे भूमिपूजन आज गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात आले. साकेडी पावनादेवी मंदिर येथील जुन्या पुरातन विहिरीचे नूतनीकरण करणे, 9 लाख, तसेच साकेडी वरचीवाडी नळ योजना विहिरीचे नूतनीकरण करणे 17 लाख ही दोन कामे जलयुक्त शिवार योजनेतून मंजूर करण्यात आली होती. गेली अनेक वर्ष या दोन्ही कामांची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. त्यानंतर आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेश साटम, माजी सभापती संजय शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, मुरारी राणे, रामप्रभू राणे, राजाराम गुरव, भिकाजी गुरव, चंद्रकांत बाबर्डेकर, लक्ष्मण राणे, वसंत ढवण, सुभाष राणे, प्रकाश कदम, संतोष मेस्त्री, विलास साटम, बाळकृष्ण राणे, विजय राणे, आपा लाड, अजित शिरसाट, रवींद्र कोरगावकर, केशव सदवडेकर, अजय सावंत आदि अनेक उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली