राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार शहरवासीयांसाठी ठरले लक्षवेधी

विविध वेशभूषेसह कलांचे अप्रतिम सादरीकरण

स्पर्धेला बच्चे कंपनीसह रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

क्षण रंगांचा… आनंदाचा…सण हा होळी चा…. जमवून सोंगे…दारी रंगला खेळ शिमग्याचा…. अशा गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
कणकवली बाजार पेठेतील शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळ आयोजित केलेली राधाकृष्ण रोंबाट शुक्रवारची मध्यरात्र
कणकवलीकरांसाठी यागदार ठरली.
राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत भव्य दिव्य चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक सरस असे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले. समर्पक
संगीत साथीवर एकापेक्षा एक सरस गौळण व भारूडांवर या सर्वच कलाकारांनी बेभान होऊन ताल-सुराच्या ठेक्यावर नाचत कलाविष्कराचे अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बाजरपेठ, झेंडा चौकातील मांड उत्सवात हलत्या ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्करांचा सोहळा नेत्रदीपक असाच ठरला.
अन् उत्तरोतर सोंगांचा कार्यक्रम रंगतदार झाला.
सिद्धिविनायक तेंडोली तळेवाडी, कल्याण पुरुष तेंडोली मोरेश्वर महाडेश्वर मित्र मंडळ नेरूळ वाघचौडी, श्री देव गावडेबाक्कलेश्वर मित्र मंडळ राईवाडी, श्री देव गावडोबा मित्र मंडळ माड्याचीवाडी, यांच्यासह इतर संघांनीही राधाकृष्णनृत्य रोंबाट स्पर्धेत उंदरावर बसलेली गणपतीचा देखावा, गरुडावर बसून निघालेली तुकाराम महाराज, स्वामी समर्थ तसेच इतर ट्रिकसुन युक्त देखावे यासोबतच मोर,पोपट, बैल,गरूड, मोर, बदक, बगळा , कोंबडी,या पक्ष्यांसह वाघ व ड्रॉगन प्राण्यांची वेशभूषेने उपस्थितांची
मने जिंकली.तर प्रेक्षकांनाही हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये कट केला. राधानृत्य, पौरणिक देखावे, एकापेक्षा एक ट्रिकनीसयुक्त चित्ररथ देखावे सोबत पारंपरिक वेशभूषेचा साज लक्षवेधी ठरला. या स्पर्धेत
जिल्ह्यातून 8 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक अनिल मुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, दिलीप पारकर ,नीलेश धडाम, राजेश सापळे, मंदार सापळे मुकुंद खानोलकर, दादा नार्वेकर राजू मानकर, काशिनाथ कसालकर, बाळा साबळे सुशील पारकर, बाळा मेनकुदळे, रमेश काळसेकर,विलास बिडये, चेतन अंधारी, प्रद्युम मुंज, हरिष उचले,विकास कानेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.
महापुरुष मित्रमंडळ हास्य कल्लोळ व राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा आयोजित करून कोकणातील लोककलेचे वैभव जपण्याचे काम करीत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. या मंडळाचे विविध उपक्रम हे स्तुत्य असतात. या स्पर्धांतून ग्रामीण भागातील कलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून हे कलाकार कलाविष्कार सादर करून शहरावासीयांना ग्रामीण संस्कृतीचे महत्व समजून सांगत आहेत. आपल्या रुंढी व परंपरांची जोपासना देखील ग्रामीण भागातील कलाकार करीत आहे,याला व्यासपीठ मिळून देण्याचे काम महापुरूष मित्रमंडळ करीत आहे. ही बाब अभिनास्पद असल्याचे परीक्षक रुपेश नेवगी यांनी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!