कणकवलीत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली, आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी संध्या. ४.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल.
विश्वावसु नाम संवत्सरे, शालीवाहन शके १९४७, गुढीपाडवा सण मोठा, नाही आनंदासी तोटा असं जे म्हटलं जातं ते सत्यच आहे. आपण सर्वांनी या नववर्षाचे स्वागत आपल्या पारंपरिक पध्दतीने करुया.हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे आयोजित स्वागत यात्रा कणकवली पंचायत समिती जवळील छ. शिवाजी महाराज चौकातून वाजतगाजत हायवे मार्गे पटवर्धन चौकात येईल व बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे समारोप होईल.
स्वागतयात्रेत लेझीम पथक, ढोल पथक, दुचाकी पथक, वारकरी दिंडी, विविध देखावे, हिंदू धर्माभिमानी यांचा सहभाग राहिल.

अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालय

  • हॉटेल उत्कर्षा, सुमनराज ट्रेड सेंटर, एस.टी. स्टँड समोर, कणकवली संपर्क क्रमांक – ९८६०३०४२२४, ७९७२७७३८३१, ९४०५२५९५९४ येथे संपर्क करावा. हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!