ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या काजू बी ची थेट खरेदी

कणकवली तालुक्यातील खरेदीचा साकेडी येथे शुभारंभ
गावात जाऊन बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांची काजू बी खरेदी
साकेडी सेंद्रिय शेती गट येथे काजू बी खरेदीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कणकवली तालुक्यामध्ये अशा प्रकारे 25 सेंद्रिय शेती गट गठीत करण्यात आले असून या अंतर्गत ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीला 516 शेतकरी जोडले गेले असून त्या अंतर्गत कणकवली तालुक्यात साकेडी येथे काजू बी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. बाजारभावानुसार शेतकऱ्यांच्या गावात काजू खरेदी करून बाजारभावानुसार दर देण्यात आला. शेतकऱ्यांनी देखील या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले. या काजू बी खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी कृषी अधिकारी मंडळ तरळे अर्जुन जाधव, सरपंच साकेडी सुरेश साटम, ATM आत्मा विनायक पाटील, कंपनी उपाध्यक्ष चंद्रकांत गुरव, कंपनी संचालक. श्री बोभाटे (काजू उद्योजक ). सागर साटम, राहुल कोलवते कृषी सहाय्यक साकेडी, ICS श्री. विनय सावंत, साकेडी सेंद्रिय गट अध्यक्ष मुरारी राणे, सेंद्रिय गटातील सर्व काजू उद्योजक शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा उपक्रम तालुका कृषी अधिकारी व्हि. वाय. मुळे व कंपनी अध्यक्ष अलंकार रावराणे यांच्या मार्गदर्शखाली पार पडला. परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत सेंद्रिय शेती गट कणकवली तालुका स्तरावर स्थापन झाले आहेत.
या सर्व 25 सेंद्रिय गटांची कणकवली ऑरगॅनिक फार्मर प्रोडूसर कंपनी निर्माण झाली. या कंपनी ला एकूण 516 शेतकरी उद्योजक जोडले गेले आहेत. याबाबत माहिती सत्यवान राणे यांनी दिली.
दिगंबर वालावलकर कणकवली