‘हास्य कल्लोळ’मध्ये कलांकुर संघाने मारली बाजी

गोरक्षनाथ कलमठ संघ द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन संघाने तृतीय क्रमांक पटकाविला

आज रात्री रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा

शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने झेंडा चौकातील मांडावर आयोजित केलेल्या ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेत कलांकुर मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ संघ, कलमठने द्वितीय तर अस्सल मालवणी क्रिएशन, कणकवली संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिक सिंधुरत्न कणकवली व गावडेवाडी कलमठ संघांनी प्राप्त केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील १० संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उदघाटन महापुरुष मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक दिलीप पारकर, दादा नार्वेकर, राजन पारकर, निवृत्ती धडाम, विजय पारकर, बाळा सापळे, अनिल मुंज, राजेश सापळे, विलास कोरगावकर, मंदार सापळे, निलेश धडाम, राजू मानकर ,काशिनाथ कसालकर, बंड्या पारकर, पांडू वर्दम, हर्षल अंधारी,चेतन अंधारी प्रद्युम मुंज, रुद्र सापळे, सोहम वाळके, सूरज ओरसकर, प्रज्वल वर्दम, पांडू वर्दम डिचोलकर, दत्ता तोरसकर, ऋषभ मेनकुदळे, प्रसन्ना देसाई, योगेश मुंज,नाना सापळे,विकास काणेकर, संदीप अंधारी,रोशन मांगले,आदी उपस्थित होते.
कलांकुर मालवण यांनी मित्रांचे अपंगत्व व यामध्ये एका आपल्यातीलच एका सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीवर जडलेले प्रेम यावर आधारित स्क्रिप्ट सादर केली. गोरक्षनाथ कलमठ यांनी सक्को मित्र पक्क ओ वैरी ही स्क्रिप्ट सादर केली. मालवणी क्रिएशन कणकवली यांनी राजकारणातील जनता दरबार ही स्क्रिप्ट सादर केली. सिंधुरत्न मालवण यांनी पुष्पा चित्रपटावरील आधारित डायलॉग करत रसिकांना पोटधरून हसवले. कलमठ गावडेवाडी ग्रुपने दिसता बाबा की जय आणि धनगर समाजप्रबोधन, शिमगोत्सवातील छबय यावर विनोद करत रंगत आणली. याबरोबरच जिल्ह्यातील अन्य संघांनी विविध विषयांवर मालवणी भाषेत स्क्रिप्ट सादर करीत रसिकांचे मनोरंजन केले. स्पर्धेचे परीक्षण अभिनेते श्याम नाडकर्णी, रुपेश नेवगी, प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या रसिक प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.
कणकवली बाजारपेठच्या मांडावर शुक्रवार २८ रोजी रात्रौ ९ वा. मांडावरील राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कुडाळ,नेरूळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला असून आपण रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापुरुष मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!