अजित पवार, हसन मुश्रीफ यांचे अबिद नाईक यांनी केले स्वागत

आंबोली दौऱ्यावेळी भेट घेत केले स्वागत

आंबोली नांगरतासवाडी येथील वसंतदादा शुगर इन्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे यांचे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी स्वागत केले

यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, अबिद नाईक यांची कन्या रिजा नाईक, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, डॉ. तुषार भोसले, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, जिल्हा सचिव सुशील चमणकर, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, जिल्हा सचिव मनोहर साटम, चंद्रशेखर मांजरेकर, गजानन कुंभार, विजय कदम, राष्ट्रवादी कणकवली शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, कणकवली युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, वेगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, केदार खोत, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!