ली मॅरियेट समूहाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुख्य संचालक प्रदीप शिंदे यांची खारेपाटण हायस्कूलला भेट

आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल ली मॅरियेट समूहाचे मुख्य संचालक प्रदीप शिंदे यांनी नुकतीच खारेपाटण हायस्कूल ला भेट दिली. याप्रसंगी त्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, विश्वस्त महेश कोळसुलकर, विश्वस्त प्रशांत गुळेकर, विजय देसाई, तसेच शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्यूनियर कॉलेज, प्लस टू व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राचार्य संजय सानप ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच उद्योजक मनोज गुळेकर हेही यावेळी उपस्थित होते
संपूर्ण शालेय परिसर पाहून माननीय प्रदीप शिंदे भारावून गेले. प्रवीण लोकरे यांनी ग्रामीण भागातील या शैक्षणिक संस्थेने आजवर अनेक विद्यार्थी घडवले हे विद्यार्थी आज देश विदेशामध्ये आपल्या कर्तुत्वाची पताका अभिमानाने फडकावीत आहेत हे आवर्जून सांगितले. संस्था करत असलेल्या विकास कामांबद्दल ही यावेळी प्राचार्य संजय सानप यांनी माननीय प्रदीप शिंदे यांना माहिती दिली.या सदिच्छा भेटीसाठी संस्थेचे विश्वस्त प्रशांत गुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी करत असलेल्या कार्याबद्दल अध्यक्ष प्रविण लोकरे व सर्व विश्वस्थ मंडळाचे,प्रदीप शिंदे यांनी अभिनंदन केले व त्यांच्या हॉटेल समूहाच्या माध्यमातून भविष्यामध्ये संस्थेला मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.