सत्ता असेल नसेल लोकहितासाठी काम करत राहणार–माजीआम. वैभव नाईक वैभव नाईक चषक राज स्पोर्ट संघाने पटकावला.

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आचरा विभागातील कार्यकर्त्यांनी दाखविलेले प्रेम हे उत्साह वाढविणारे आहे.यातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते.सत्ता असो वा नसो लोकहितासाठी नेहमी काम करत राहणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आचरा येथे सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने वैभव नाईक चषक भव्य ओव्हरआर्म लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आचरा भंडारवाडी मैदानावर तीन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वैभव नाईक यांनी अंतिम सामन्याला उपस्थिती दर्शवत क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी शिवसैनिकांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवासेना मालवण शहर प्रमुख सिद्धेश मांजरेकर,जेष्ठ उद्योजक आबा दुखंडे,तेजस राणे,उदय दुखंडे,आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे,आचरा विभाग संघटक मंगेश टेमकर,आचरा विभाग संघटक पप्पू परुळेकर,उपविभाग प्रमुख सचिन रेडकर,चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर,माणिक राणे, रुपम टेमकर,पळसंब उपसरपंच अविराज परब,आचरा मच्छीमार नेते नारायण कुबल,राजु नार्वेकर,आबा हुदेकर, नितीन घाडी,वायंगणी ग्रामपंचायत सदस्य बाप्पा वायंगणकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक राज स्पोर्ट संघ मालक -सौरभ सावंत यांनी पटकाविले. तर द्वितीय क्रमांक सान्वी स्पोर्ट मसुरा यांच्या संघांनी पटकाविला. अन्वी स्पोर्ट भगवंतगड मालक अमोल मांजरेकर यांनी तृतीय क्रमांक व सिराॅक बिच रिसाॅट संघ मालक रुपम टेमकर यांच्या संघांनी चौथा क्रमांक पटकाविला.अंतिम सामान्यांचा शुभारंभ मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.वैभव नाईक यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

error: Content is protected !!